पाकिस्तानला कतारकडून 3 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य

इस्लामाबाद/ दोहा – आर्थिक अडचणीमुळे हवालदिल झालेल्या पाकिस्तानला कतारकडून 3 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. कतारचे आमिर शेख तमिम बिन हमाद यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावरून मायदेशी जाताना व्यापार, ऍन्टी मनी लॉंडरिंग आणि दहशतवादाच्या अर्थसहाय्याला रोखण्यात सहकार्याची हमी दिली आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानला गेल्या 11 महिन्यांपासून 4 मोठ्या देशांनी मोठे अर्थसहाय्य केले आहे. सर्वात प्रथम चीनने 4.6 अब्ज डॉलरच्या ठेवी आणि व्यवसायिक कर्जाच्या स्वरुपात पाकिस्तानला मदत केली.

त्यानंतर सौदी अरेबियाने 3 अब्ज डॉलरची रोख ठेव आणि 3.2 अब्ज डॉलर किंमतीची भविष्यातील तेलाच्या पेमेंटवरील सुविधा पाकिस्तानला दिली. संयुक्‍त अरब अमिरातीनेही 2 अब्ज डॉलरची आर्थिक मदत पाकिस्तानला दिली आहे. कतारच्या अर्थसहाय्याची घोषणा कतारचे परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.