उत्तरप्रेदशात अवैधरित्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक

लखनौ – उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये गुन्हेगारांना अवैधरित्या शस्त्रात्रांचा पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस) ही कारवाई केली आहे.

दानिश करीम (वय ३०), मोहम्मद शाहिद(वय ३०) आणि आयाझ सिद्दिकी(वय ३२) अशी आरोपींची नाव आहेत. या कारवाई दरम्यान उत्तर प्रेदश पोलिसांनी त्यांच्याकडून ५ अवैध पिस्तूल देखील जप्त केल्या आहेत.

दरम्यान, १६ सप्टेंबरला जुन्या लखनौमध्ये गुन्हेगारांना ही शस्त्रास्त्रे अवैधरित्या पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली आणि या भागात नाकाबंदी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.