अहमदनगर- अहमदनगर जिल्हात 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यातील 2 जणांनी परदेशी वारी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर गेली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
या 17 पैकी 10 जणं हे निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे परिस्थितीचं गांर्भीय बाळगा, शासनेच्या सुचनांचं उल्लंघन करु नका, असं आवाहन अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना केले आहे.
दरम्यान, आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने 437 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील 356 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 17 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.