इचलकरंजी- लॉकडाऊनमुळे काम नसल्याने गावी परतण्याच्या मागणीसाठी परप्रांतीय कामगार आक्रमक झाले आहेत. इचलकरंजीजवळील खोतवाडी या गावांमध्ये परप्रांतीयांना गावी पाठवण्याची तयारी सुरू असतानाच या परप्रांतीयांनी सोमवारी ग्रामपंचायत, सरपंच यांच्यावर हल्ला केला.
जमावाच्या दगडफेकीत एक महिला पोलीस जखमी झाली आहे. तारदाळ खोतवाडी या गावातील या गावात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. ते इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग तसेच लगतच्या पार्वती व लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये काम करीत असतात.
काम आणि पगार नसल्याने त्यांनी गावी जाण्याची तयारी केली आहे. परप्रांतीयांना त्यांच्या गावी सोडण्याची तयारी सुरू असून दररोज काही रेल्वेतून कामगार त्यांच्या गावी रवाना होत आहेत. मात्र, ज्यांना जाण्याची संधी मिळत नाही ते कामगार अस्वस्थ झाले आहेत. त्यातून आजचा हा प्रकार घडला.