713 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या 296 रुग्णांना दहा दिवसांनंतर शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला.
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावळी तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 47, खंडाळा तालुक्यातील 33, खटाव तालुक्यातील 10, कोरेगाव तालुक्यातील 31, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील 15, फलटण तालुक्यातील 23, सातारा तालुक्यातील 65, वाई तालुक्यातील 61 जणांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 64, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 30, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 21, कोरेगाव 38, वाई 51, शिरवळ 65, रायगाव 56, पानमळेवाडी येथील 56, मायणी 61, महाबळेश्वर 50, पाटण 38, दहिवडी 21, खावली 90 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 72 अशा एकूण 713 जणांचे नमुने पुणे, सातारा व कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.