ब्राझीलमध्ये आतापर्यंत 29 लाख 17 हजार 562 जणांना करोनाची बाधा झाली असून करोना रुग्णवाढीच्या संख्येत जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामधील 20 लाख 47 हजार 660 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ब्राझीलमध्ये शुक्रवारी 54 हजार 801 नवे करोना रुग्ण आढळून आले. तर 1226 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ब्राझीलमध्ये 7 लाख 71 हजार 258 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8 हजार 318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 98 हजार 644 जणांचा मृत्यू झाला आहे.