29 अवैध वाहनांवर कारवाई

पोलीस, पीएमपी आणि आरटीओची संयुक्‍त मोहीम  

पुणे – शहरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या अवैध वाहतुकीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशा 29 अवैध वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) कारवाई करत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपलेल्या तब्बल 29 वाहनांवर कारवाई केली. दंडात्मक आणि जप्तीची कारवाई यावेळी आली आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. दि. 15 रोजी नगर, सोलापूर आणि सातारा रस्त्यावर विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्या एकूण 29 वाहनांमध्ये 12 स्क्रॅप रिक्षा, 2 पीएमपी बसेस आणि 15 अन्य अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. अवैध रिक्षा, रिक्षा भाडे नाकारणे, विना परवाना, विना पासिंग, विना गणवेश रिक्षा चालविणे, सहा आसनी रिक्षा, स्क्रॅप रिक्षा, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आदींबाबत कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)