सातारा – जिल्ह्यात करोनाची दहशत वाढत असून मंगळवारी रात्रीच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत एकाच दिवसातील उच्चांकी 261 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर बुधवारी दिवसभरात आणखी 304 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर जिल्ह्यातील पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या 6504 झाली आहे. तर करोनामुळे एकूण 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पाच जणांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात कंधारवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुषाचा, कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 84 वर्षीय महिला व वाजेगाव ता. पाटण येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पिटलमध्ये कराड येथील 30 वर्षीय पुरुष अशा एकूण पाच करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली.
साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्या 25 जणांचा अहवाल करोनाबाधित आला आहे, अशी माहिती बुधवारी सायंकाळी मिळाली. त्यानुसार फलटण तालुकयातील सोनवडी खुर्द येथील 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 12, 8 वर्षीय बालक, शिंदेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, नांदळ येथील 23, 47 वर्षीय महिला, दत्तनगर येथील 32 वर्षीय महिला, सासवड येथील 60 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 64 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे येथील 49 वर्षीय पुरुष.,
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील 30 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पळशी येथील 55 वर्षीय पुरुष, 28, 49, 75 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालिका, वडूज येथील 15, 3 वर्षीय बालक, 67 वर्षीय पुरुष, 57, 36 वर्षीय महिला, पुसेगाव येथील 40 वर्षीय पुरुष, वाकेश्वर येथील 65 वर्षीय महिला यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 261 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तसेच पाच बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली.
या करोनाबाधित रुग्णांटा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. कराड तालुका ः गोंदी एक पुरुष, चोरे दोन पुरुष, जखिणवाडी एक महिला, मलकापूर दोन पुरुष, आगाशिवनगर एक पुरुष,
नारायणवाडी एक पुरुष, वसंतगड दोन पुरुष, एक मुलगा, शामगाव एक पुरुष, खोलेवाडी एक पुरुष, नारायणवाडी एक पुरूष, काले एक पुरुष, चिखली मारल एक पुरुष, टाकेवस्ती चचेगाव एक महिला, सैदापूर एक पुरुष, एक महिला, टेंभू दोन पुरुष, एक महिला, वडगाव तीन पुरुष, तीन महिला, एक पुरुष, टेंभू एक पुरुष, धनगरवाडी एक पुरुष, गोळेश्वर दोन पुरुष, कालवडे एक पुरुष, मनव एक पुरुष, वडगाव उंब्रज दोन महिला,
2 वर्षे व 6 वर्षाचा बालक, ओंड दोन पुरुष, एक महिला, आंतवडी एक पुरुष, मुंडे एक पुरुष, घारगेवाडी एक पुरुष, सुपने तीन पुरुष, वडोली निळेश्वर दोन पुरुष, दोन महिला, कार्वे नाका एक पुरुष, काशेगाव एक पुरुष, बनवडी एक महिला, कराड येथील दहा पुरुष, आठ महिला, 8 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा, गोवारे रोड, कृष्णा कॅनॉल एक महिला,
संगम हॉटेलजवळ एक पुरुष, कुंभार गल्ली एक महिला, काझीवाडा एक महिला, उपजिल्हा रुग्णालय एक पुरुष, एक महिला, 6, 7 वर्षाचा मुलगा, रविवार पेठ एक पुरुष, 5 महिला, सोमवार पेठ तीन पुरुष, तीन महिला, बुधवार पेठ सहा महिला, 1 व 3 वर्षाचे बालक, शनिवार पेठ 10 पुरुष, 3 महिला, 9 वर्षाचा मुलगा, मंगळवार पेठ एक पुरुष, शुक्रवार पेठ पाच पुरुष, दोन महिला, 2 वर्षाची बालिका, गुरुवार पेठ एक महिला, एक पुरुष.
पाटण तालुका ः मारुल हवेली दोन पुरुष,
चार महिला, 10, 8 व 4 वर्षाचा बालक, सूर्याचीवाडी एक महिला, तीन पुरुष, पाटण सात पुरुष, सात महिला, वाजेगाव मारुल एक महिला, ढेबेवाडी एक पुरुष, नाडे एक पुरुष, पापर्डे येथील 53 वर्षीय पुरुष. वाई तालुका ः शाहबाग एक पुरुष, एक महिला, रविवार पेठ एक पुरुष, व्याजवाडी एक पुरुष, वाई एक पुरुष, उडतारे एक पुरुष. सातारा तालुका ः काशीळ एक पुरुष, वाढे एक पुरुष, अतित एक पुरुष, वळसे एक पुरुष, सोनापूर एक पुरुष, सासपडे एक पुरुष, गडकर आळी एक पुरुष,
शनिवार पेठ दोन पुरुष, गुरुवार पेठ एक महिला, चिमणपुरा पेठ एक पुरुष, न्यू सिव्हिल कॉलनी एक पुरुष, तामजाईनगर एक महिला, 13 वर्षाचा बालक, विकासनगर एक महिला, कारंडवाडी एक महिला, गोडोली एक पुरुष, गुरुवार पेठ 13 वर्षाचा युवक, एक महिला, करंजे पेठ येथील दोन पुरुष, एक महिला, जानकर कॉलनी एक महिला, सत्यनगर चार महिला, एक पुरुष. फलटण तालुका ः फलटण दोन पुरुष, मंगळवार पेठ दोन पुरुष,
मालोजीनगरजवळ फलटण एक पुरुष, रविवार पेठ एक महिला, गिरवी एक महिला, एक पुरुष, निरगुडी एक पुरुष, विडणी दोन महिला.
कोरेगाव तालुका ः नडवाल एक मुलगा, एक महिला, सोळशी एक पुरुष, रहिमतपूर तीन महिला, 1 वर्षाचा बालक. खंडाळा तालुका ः शिरवळ दोन पुरुष, लोणंद एक पुरुष, एक महिला, पाडळी एक पुरुष, खंडाळा एक पुरुष. माण तालुका ः म्हसवड एक पुरुष, भालवडी एक पुरुष. महाबळेश्वर तालुका ः महोल्ला स्कूल एक पुरुष. खटाव तालुका ः मायणी दोन पुरुष, वडूज एक महिला, 55 वर्षीय पुरुष. जावळी तालुका ः जावळी एक महिला. वाळवा येथील 23 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी