गेल्या पाच वर्षात देशात 284 अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक – अर्थमंत्री

सन 2014 ते 2019 या कालावधीत देशात एकूण 284 अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. पाच वर्षातील एकत्रित थेट विदेशी गुंतवणुकीचा उल्लेख करताना त्यांनी त्या आधीच्या पाच वर्षाच्या काळाच्या तुलनेत नव्या पाच वर्षात थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी निदर्शनाला आणले.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात देशातील थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण पंधरा टक्‍क्‍यांनी वाढून ते 26 अब्ज डॉलर्स इतके झाल्याचे त्यांनी नमूद केले. सेवा क्षेत्र, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबॉईल, आणि व्यापार या क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंगापुरहून भारतात विदेशी गुंतवणूक येण्याचे प्रमाण मोठे असल्याचे नमूद करताना त्या म्हणाल्या की, चालू आर्थिक वर्षात सिंगापुरहून आत्तापर्यंत 8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. त्यानंतर मॉरिशस, अमेरिका, नेदरलॅंड आणि जपान या देशांचा नंबर लागतो. गेल्या वर्षी सरकारने विदेशी गुंतवणुकीच्या नियंमांमध्ये सुटसुटीतपणा आणला, त्याचा चांगला लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.