पुणे (प्रभात वृत्तसेवा) – कैद्यांना करोनाची बाधा होऊ नये ,यासाठी न्यायालयाने ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या 282 कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचा आदेश येरवडा जेल प्रशासनाला दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. 17 ते 28 मार्च या कालावधीत येरवडा तुरूंगातून 281 कैद्यांना सोडण्यात आले आहे. अशी माहिती प्रमुख पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली.
गर्दीच्या ठिकाणी करोना विषाणूचा संसर्गात वाढ होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्य न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाला उच्च स्थरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. समितीने ज्या गुन्हयात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा झाली व ते आरोपी महाराष्ट्रात राहतात अशा आरोपीना वयक्तिक जातमुचलक्यावर सोडणायचे आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी.धोटे यांनी त्या दृष्टीकोनातून परिपत्रक काढले आहे.