नवी दिल्ली – एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 28,472 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. शिवाय गेल्या 24 तासात बरे झालेल्या/ घरी सोडण्यात आलेल्या कोविड-19 रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यासह, बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 7,53,049 इतकी आहे. यामुळे कोविड-19 रूग्णांमधील बरे होण्याचा दर 63.13 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
रुग्ण बरे होण्याच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे सक्रिय रुग्ण संख्येतील फरक उतरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रगतीचे निदर्शक आहे. राष्ट्रीय पातळीवर रुग्ण बरे होण्याचा दर सुधारला असताना 19 राज्यांमधील हाच दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
एम्स, नवी दिल्लीच्या “ई-आयसीयू’ कार्यक्रमद्वारे आठवड्यातून दोनदा आयोजित “टेलि-कन्सल्टेशन’ सत्रांमुळे अति दक्षता विभागातील रूग्णांच्या व्यवस्थापनातील तज्ज्ञांच्यासमान अनुभव व तांत्रिक सल्ल्याद्वारे राज्यातील मोठ्या कोविड-19रुग्णालयांना मार्गदर्शन व आधार मिळत आहे. आरोग्य सेवा कर्मचार्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आहे व 2.41 टक्के असलेला मृत्यू दर सतत कमी होत आहे.