बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहर व तालुक्यात नव्याने 28 जणांना कोणाची लागण झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे.तसेच उपचार घेत असलेल्या शहरातील दोघांचा मृत्यू देखील झाला आहे. एकूण रुग्ण संख्या 776 तर आत्तापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
बारामती मध्ये दि (२९) रोजी एकूण 186 जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 137 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अठरा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तसेच बारामती शहरातील सतरा व ग्रामीण भागातील 11 अशा 28 जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव आलेला असून इंदापूर व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. बारामतीतील रुग्णसंख्या 776 झालेले आहे तसेच काल रात्री बारामतीतील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असलेल्या शहरातील दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.