नवी दिल्ली – कसिनो, घोड्याची शर्यत आणि ऑनलाइन गेमिंग वर 28 टक्के जीएसटी असावा अशी शिफारस राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या समितीने केली असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रमा भट्टाचार्य यांनी दिली.
मात्र हा वाढीव जीएसटी ढोबळ मूल्यांकनावर की निव्वळ मूल्यांकनावर लावायचा यासंदर्भात समितीची अजून झालेला नाही. यासंदर्भात चर्चा चालू असून लवकरच या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटीचे मूल्यांकन कसे करायचे यासंदर्भात मंत्री विचार करीत आहेत. सध्या घोड्याची शर्यत, कसीनो आणि ऑनलाइन गेमिंग वर 18 टक्के जीएसटी लागतो. तो कमी आहे असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले. या सेवांचे मूल्यांकन कशा पद्धतीने करावे हे ठरविण्यासाठी गेल्या वर्षी मंत्र्यांची समिती नेमण्यात आली होती.