खेडमध्ये २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

तीन गावांत सरपंचपदाची निवडणूक ः 8 डिसेंबरला मतदान

राजगुरुनगर – खेड तालुक्‍यातील टेकवडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसह, 27 ग्रामपंचायतीच्या 38 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकी, 3 गावांच्या रिक्त सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.

टेकवडी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. येथे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. सरपंच निवडणूक लोकनियुक्त होत असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. सायगाव, कडाचीवाडी आणि होलेवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंचपदाच्या निवडणुका थेट जनतेतून होणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी सायगाव येथील ग्रामपंचायत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होती मात्र या पदासाठी अर्ज न आल्याने सरपंच रिक्त होते. कडाचीवाडी सरपंचपद रिक्त होते ते अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. होलेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंचपद राखीव आहे.

महिला सरपंचांनी राजीनामा दिल्याने येथे सरपंचदासाठी चुरस होणार आहे. सरपंचपदाची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीयदृष्ट्या आपल्या गटाचा सरपंच होण्यासाठी दोन्ही गटाने निवडणूक चुरशीची केल्याने उमेदवाराची जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 14 डिसेंबर ते 31 मार्च 2020पर्यंत ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जाहिर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रशासनाने तयारी केली आहे.

राजगुरुनगर येथील नगरपरिषदेच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर व्यवस्था केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार, दि. 16 ते 21 नोंव्हेंबरपर्यंत मुदत आहे. छाननी 22 नोंव्हेंबर, माघार आणि चिन्हवाटप 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान रविवार, दि. 8 डिसेंबर तर मतमोजणी 9 डिसेंबर रोजी राजगुरुनगर येथे होणार आहे.

निवडणुका असलेल्या ग्रामपंचायती –
वेताळे, पांगरी, सायगाव, साबुर्डी, धुवोली, धामणगाव खुु., भोरगिरी, मेदनकरवाडी, भोमाळे, एकलहरे, जऊळूके बु., कोयाळी तर्फे वाडा, कुरुळी, साकुर्डी, वाशेरे, टोकावडे, चिबंळी, खरपुड, परसुल, वाजवणे, नाणेकरवाडी, वहागाव, पाळू, आसखेड खु., रासे, हेद्रूज, कोळीये या ग्रामपंचायतीच्या 38 रिक्त जागांच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.