पुणे – गेल्या 24 तासांत करोना रुग्णांत 278 ने वाढ झाली असून, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 77 हजार 047 झाली आहे. बाधितांमधील 4,668 रुग्ण ऍक्टिव्ह असून, त्यापैकी 383 रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यातील 224 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.
एकूण मृत्यू पावलेल्यांची संख्या 4,592 असून, त्यात शुक्रवारी मृत्यू पावलेल्या 6 रुग्णांचा समावेश आहे. त्यातील 2 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.
पॉझिटिव्हमधील 1 लाख 67 हजार 787 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 481 रुग्णांना उपचारांती घरी सोडले आहे. दिवसभरात 3,109 जणांची स्वॅबटेस्ट घेण्यात आली.