पुणे शहरात करोनाचे 273 नवीन बाधित, दिवसभरात 345 डिस्चार्ज

पुणे  – शहरात रविवारी नव्याने 273 करोनाबाधित सापडले. तर दिवसभरात 345 जण करोनामुक्त झाले आहेत. मागील पंधरा दिवसांत बाधित सापडण्याचे प्रमाण पावणेतीनशे ते साडेतीनशेच्या आसपास आहे. दरम्यान, शहरात करोनामुक्तीचे प्रमाण 96 टक्के इतके असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

 

 

रविवारी (दि. 17) दिवसभरात 3 हजार 205 करोना संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. तर मागील दोन दिवसांत केलेल्या तपासणी अहवालातील 273 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 1 लाख 83 हजार 714 इतकी झाली आहे. त्यातील 1 लाख 75 हजार 973 जण करोनामुक्त झाले आहेत.

 

 

गेल्या 24 तासांत करोनामुळे शहर हद्दीत 3, तर ग्रामीण व अन्य जिल्ह्यातील 6 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे. आतापर्यंत 4 हजार 703 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

 

 

सध्या 2 हजार 498 सक्रीय बाधित असून, त्यातील 206 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 293 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.