Palghar Students Poisoned | पालघरमधील एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे.
आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना जेवण झाल्यानंतर मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला 27 विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना रात्री अडीच वाजता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेवणातून आणि पाण्यातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 8 विद्यार्थिनींची प्रकृती थोडी चिंताजनक आहे. तर 20 विद्यार्थ्यांना इंजेक्शन देऊन अंडर ऑब्झरवेशन ठेवले असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. Palghar Students Poisoned |
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक आढळल्याची घटना समोर आली होती. तर घाटकोपरच्या केव्हीके शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये झुरळ आढळले होते. मागील काही दिवसांपासून समोर येत असलेल्या या घटनांमुळे पालकांकडून देखील संताप केला जात आहे. Palghar Students Poisoned |
हेही वाचा:
कर्जाची परतफेड करण्यासाठी चोरल्या दुचाकी ; पोलिसांकडून चोरट्याला बेड्या, दहा गाड्याही जप्त