सातारा : जिल्ह्यात 27 नागरिकांची करोनावर मात

296 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतल्यानंतर 27 नागरिकांना बुधवारी घरी सोडण्यात आले, तर 296 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 22, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 29, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील दहा, कोरेगाव 18, वाई 36, खंडाळा एक, रायगाव 17, पानमळेवाडी 69, महाबळेश्वर 15, दहिवडी 12, तरडगाव 26 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 41, असे एकूण 296 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

करोनाची सद्य स्थिती
घेतलेले एकूण नमुने – 297787
एकूण बाधित – 55336
घरी सोडण्यात आलेले – 52786
मृत्यू – 1803
उपचारार्थ रुग्ण – 747

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.