सेन्सेक्‍सचा 26 हजार अंकाला स्पर्श

मोठ्या कंपन्यांच्या चमकदार ताळेबंदाच्या सादरीकरणाचा परिणाम 

नवी दिल्ली: कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत असल्यामुळे देशातील संस्थागत गुंतवणूकदाराबरोबरच परदेशील गुंतवणूकदारानीही खरेदी चालू ठेवली आहे. स्टेट बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेसह बड्या कंपन्याच्या शेअरला मागणी चालूच आहे. त्यामुळे आज सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली. गेल्या चार दिवसापासून निर्देशांक ऐतिहासिक उच्च पातळीवर आहेत. मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे काही सावध गुंतवणूकदार नफाही काढून घेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरुवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 126 अंकानी म्हणजे 0.34 टक्‍क्‍यानी वाढून 36984 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. सकाळी सेन्सेक्‍स 37061 अंकापर्यंत वाढला होता. मात्र नंतर नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांकाना ती पातळी राखता आली नाही. गेल्या चार दिवासत सेन्सेक्‍स तब्बल 507 अंकानी वाढला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 35 अंकानी वाढून 11167 अंकावर बंद झाला.
काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1195 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 97 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. रुपया गेल्या दोन दिवासात काही प्रमाणात मजबुत झाल्यामुळेही निर्देशांकाना आधार मिळत आहे. ळकूणच आज खरेदीसाठी पूरक वातावरण असल्यामुळे मिडकॅप 0.76 टक्‍क्‍यानी वाढला तर स्मॉल कॅप 0.31 टक्‍क्‍यानी वाढला.

कंपन्या जांले ताळेबहद जाहीर करीत आहेत. त्याचबरोबर भांहवल सुलभता आहे, त्यामुळे खणेदीसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यातच रुपयाचे मुल्य आता आठवड्याच्या उचांकी पातळीवर गेले आहे. त्यामुळे निर्देशशंक उच्च पातळीवर असूनही विक्रीपेक्षा खरेदीचे प्रमाण जास्त आहे.

जीएसटी परिषदेने परवा बऱ्याच वस्तूवरील कर 28 टक्‍क्‍यावरून 16 टक्‍के केले आहेत. पावसाळा चांगला असल्यामुळे ग्रामिण भागातील क्रयशक्ती वाढणार आहे. त्यामुळे बाजारातील मूड सकारात्मक आहे.

आज बॅंकहग क्षेत्राचा निर्देशांक 1.43 टक्‍क्‍यानी वाढला. त्यात आयसीआयसीआय बॅंकेचे आणि स्टेट बॅंकेचे मोठे योगदान आहे. उर्जा क्षेत्राचा निर्देशांक आज सर्वात ास्त म्हणजे 1.44 टक्‍क्‍यानी वाढला. पायाभूत सुविधा क्षेत्राचा निर्देशांक 1.15 टक्‍क्‍यानी, अिॅल्टी क्षेत्राचा निर्देशांक 0.73 टक्‍क्‍यानी, आरोग्य क्षेत्राचा निर्देशांक 0.40 टक्‍क्‍यानी तर तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 0.18 टक्‍क्‍यानी वाढला. मात्र उशिरा झालेल्या नफेखारीचा धातू, माहीती तत्रज्ञान, भांडवली वस्तू, वाहन क्षेत्राला फटका बसला. या क्षेत्राचे निर्देशांक आज 0.68 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)