681 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 260 रुग्णांना दहा दिवसांनतर गुरूवारी घरी सोडण्यात आले. तर 681 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये जावळी तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 33, खंडाळा तालुक्यातील 29, खटाव तालुक्यातील 16, कोरेगाव तालुक्यातील 34, महाबळेश्वर तालुक्यातील 10, पाटण तालुक्यातील 13, फलटण तालुक्यातील 27, सातारा तालुक्यातील 83, वाई तालुक्यातील 14 अशा एकूण 260 जणांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 19, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 91, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 33, कोरेगाव 14, वाई 50, खंडाळा 46, रायगाव 58, मायणी 78, महाबळेश्वर 50, पानमळेवाडी 63, पाटण 8, दहिवडी 26, खावली 48 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 97 अशा एकूण 681 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.