26/11 हल्ल्याच्या वेळी अतिरेक्यांचा शस्त्रसाठा शोधून देणाऱ्या ‘नॉटी’ श्वानाचा मृत्यू

मुंबई – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेला अतिरेकी हल्ला मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात जशाचा तसा आहे. या हल्ल्यावेळी अतिरेक्यांशी लढताना अनेक पोलिसांनी आणि जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या हल्ल्यात अतिरेक्यांचा शस्त्रसाठा शोधण्यासाठी कॅनिग सैनिक असलेल्या श्वानांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे अतिरेक्यांचा मोठा शस्त्रसाठा हाती लागला होता. त्या कॅनिंग सैनिकांपैकी एक असलेल्या ‘नॉटी’ या श्वानाचं निधन झालं आहे.

सोमवारी पालघर येथे ‘नॉटी’ने अखेरचा श्वास घेतला. तो १४ वर्षांचा होता. पालघरमधील रणजीपटू राजेश सुतार यांनी नॉटीला दत्तक घेतलं होतं. नॉटी २०१२ मध्ये सेवेतून निवृत्त झाला होता. अतिरेकी अजमल कसाब याने लपविलेला शस्त्रसाठा शोधून देण्यात नॉटीने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. नॉटीला शौर्य पुरस्कार देखील मिळाली होता.

नॉटी नुकताच १४ वर्षांचा झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक आजारी पडला होता. त्यातच सोमवारी नॉटीचं निधन झालं. नॉटीने आपल्या सेवेत केलेली कामगिरी स्मरणात राहणारी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.