26/11 च्या खटल्याबाबत पाकिस्तान सरकारच निष्क्रीय…

लाहोर – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींवरचा खटला गेल्या 10 वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. पाकिस्तानातील कोणत्याही संशयिताला या प्रकरणी शिक्षा झालेली नाही. हा खटला पाकिस्तानसाठी कधीच प्रधान्याचा नव्हता, हेच त्यातून सिद्ध होते. दहशतवाद विरोधी न्यायालयाने सर्व 70 साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाची साप्ताहिक सुनावणीही झालेली नाही.

भारतातील 24 साक्षीदारांचे जबाब जोपर्यंत नोंदवले जात नाहीत, तोपर्यंत या खटल्याचे कामकाज पुढे सरकू शकणार नाही. यासंदर्भात पाकिस्तानने भारताला पत्र पाठवले आहे. मात्र या प्रकरणाचा मास्टर माईंड हाफिज सईद असल्याचे पुरावे आगोदरच दिल्याचे भारताचे म्हणणे आहे. या खटल्यात झकिउर रेहमान लखवी याच्यासह 7 जणांविरोधात हत्या आणि हत्येचा कट यासारखे आरोप आहेत. लखवी व्यतिरिक्‍त अन्य 6 जणांना रावळपिंडीच्या तुरुंगात ठेवले गेले आहे. लखवीला तीन वर्षांपूर्वी जामिनावर सोडले गेले. तेंव्हापासून तो बेपत्ता आहे. मुंबईवर 26/11 च्या हल्ल्यामध्ये 168 नागरिक मारले गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)