पुणे : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनचा २५ वा पदविका प्रदान समारंभ, शुक्रवारी (दि. २४) सकाळी दहा वाजता संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ पुणे विभागीय तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
समारंभात एक्साइड एनर्जी सोल्युशन्सचे सीईओ डॉ. मंदार देव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग ॲड. गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्या शाखेतील सर्व स्नातकांना पदविका प्रदान करण्यात येणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली.