- बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ
- 67 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन दिवस रुग्णसंख्या स्थिरावली होती. मात्र आज पुन्हा रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. आज नवीन 2518 बाधितांची नोंद झाली आहे. तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज नोंद झालेल्या मृत्यूमध्ये तरूणांचा समावेश अधिक आहे. आजपर्यंत शहरात 2 लाख 23 हजार 966 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (दि. 6) शहरात 2518 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 23 हजार 966 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 67 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 42 व शहराबाहेरील 25 जणांचा समावेश आहे.
शहरातील चिंचवड, सांगवी, पिंपरी, निगडी, भोसरी, चऱ्होली, तळवडे, पिंपळे सौदागर यासह शहरातील विविध भागातील 42 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील पाषाण, वडगाव, धनकवडी, पुणे, आंबेगाव, फलटण, खेड, बिबवेवाडी, घोरपडी येथील 25 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 4844 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 3215 व शहराबाहेरील 1629 जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरामध्ये 1315 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 98 हजार 690 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 9963 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 6845 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 15216 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 22,061 इतकी आहे. आज दिवसभरामध्ये 13,735 जणांना लस देण्यात आली. तर आजपर्यंत 4 लाख 18 हजार 375 जणांना लस देण्यात आली आहे.
मावळात आणखी 214 करोनाबाधित
मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 6) 214 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यात दिवसभरात 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला नाही.आतापर्यंत 319 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.सद्यःस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1748 आहे. शहरी भागात 128 तर ग्रामीण भागात 86 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 24 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 98 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले. तालुक्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 14,961 झाली आहे. तर दिवसभरात 118 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. गुरुवारी आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात टाकवे बुद्रुक 15, इंदोरी 15, कामशेत 10, कुसगाव बुद्रुक 9, वराळे 7, तळेगाव दाभाडे ग्रामीण 3, आंबी 2, डाहुली 2, डोंगर गाव 2, जांभूळ 2, कुणे नामा 2, कुरवंडे 2, शिरगाव 2, साते, सुदवडी, कुसगाव बुद्रुक, ब्राम्हण वाडी (साते), चिखलसे, दारुंब्रे, कान्हे, केवरे व नवलाख उंब्रे प्रत्येकी 1 एकूण 86 रुग्ण सापडले.