पुणे – दिवसभरात 250 नव्या करोना बाधितांची नोंद झाली असून, 327 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 16 महिन्यांत 28 लाख 39 हजार 685 संशयितांच्या स्वॅब टेस्ट शहरात झाल्या. त्यात 4 लाख 85 हजार 716 जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यातील 4 लाख 74 हजार 193 जण बरे झाले, तर 8 हजार 731 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गेल्या 24 तासांत मृत पावलेल्या 6 जणांचा समावेश आहे. अन्य तीन मृत पुण्याबाहेरील आहेत.
सध्या 2 हजार 792 सक्रीय बाधित असून, त्यातील 231 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर 327 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. दिवसभरात 6 हजार 987 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आली आहे.