हृदयद्रावक ! माहेराहून नाशिककडे निघालेल्या ‘त्या’ मायलेकींचा दुर्दैवी अंत; गोदापात्रात तरंगताना आढळले मृतदेह

नाशिक – म्हऱ्हळ येथील माहेराहून नाशिककडे येण्यासाठी निघालेल्या ज्योती योगेश राठी (वय 25) आणि त्यांची मुलगी जिया (वय 3 वर्षे) चार तारखेला नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील बसस्थानकावरून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा मृतदेह गोदापात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघी मायलेकी चार जानेवारी रोजी नांदूर शिंगोटे येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद वावी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तेंव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. सोशल मीडियावर त्यांचा फोटोही व्हायरल केला गेला होता. त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

सात तारखेला ज्योती राठी यांचा मृतदेह नाशिक येथील रामवाडी पूलाजवळ गोदापात्रात तरंगताना आढळला होता. मात्र त्यावेळी मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्यानंतर 14 तारखेला चिमुरडी जियाचा मृतदेह गांधी तलावात आढळून आला. दोन्हीही मृतदेह आढळून आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.