टाकळी हाजी -आषाढी एकादशीनिमित्त टाकळी हाजी येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. टाकळी हाजी येथे गेल्या 25 वर्षांपासून दिंडी व आषाढी वारीची परंपरा जपली जात आहे.
विठ्ठलाच्या भेटीची आस वारकऱ्यांना लागलेली असते. यावर्षी करोनाच्या संकटामुळे गावातच विठ्ठल मंदिरात पूजा करण्यात आली, तसेच वारकऱ्यांनी घरीच भजन करत विठ्ठल नामाचा जप केला असल्याचे हभप शिवाजी महाराज कांदळकर यांनी सांगितले.
यावेळी जि. प. सदस्या सुनीता गावडे, दिंडी मंडळाचे अध्यक्ष सुभाष महाराज गावडे, चेअरमन बन्सी घोडे, सोनभाऊ कांदळकर, मारूती महाराज पोटे, रोहीदास घोडे, शिवाजी महाराज कांदळकर, अनंत महाराज टाकळीकर व वारकरी उपस्थित होते.