मिरज – पतीने चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याची घटना मिरज मध्ये उघडकीस आली आहे. शहरातील मिरज-टाकळी रस्त्यावरील शिवम पार्क मध्ये हा प्रकार घडला आहे. खून केल्यानंतर आरोपी पती पसार झाला आहे.
पूजा चेतन माने,वय 25 असे पत्नीचे नाव असून चेतन माने आरोपीचे नाव आहे. चेतन यास दारूचे व्यसन असून त्याचा टेलरिंगचा व्यवसाय होता. दारुच्या व्यसनामुळे त्याचे सतत पत्नीसोबत वाद होत असंत. व्यसानामुळे कटांळून कुटुंबातील सदस्यांनी त्याला घरातून बाहेर काढले होते.
चेतन हा रविवारी दारूच्या नशेत घरी आला यावेळी त्याचे पत्नी सोबत वाद झाले. त्यातूनच त्याने धारधार चाकूने पूजा हिच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चार वार केले. व त्यानंतर पसार झाला.