पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण सोडतीवर 25 हरकती दाखल झालेल्या आहेत. त्यातील 11 हरकती या दुबार आल्या असून, या हरकतींवर महापालिका आयुक्त निर्णय घेणार आहेत. त्यानंतर आरक्षणांची अंतिम यादी 13 जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
महापालिकेच्या 58 प्रभागांमधील अनुसूचित जाती, जमाती आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गाची आरक्षण सोडत 31 मे रोजी काढण्यात आली. त्यानंतर या आरक्षण सोडतीवर हरकती-सूचना नोंदविण्याची 6 जून अखेरची मुदत होती. त्यानुसार जवळपास 25 हरकती दाखल झाल्या असल्याचे पालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. यात प्रामुख्याने प्रभाग रचनेबाबतच हरकती घेण्यात आल्या आहेत. तर आरक्षणाबाबत काही मोजक्याच हरकती आहे.
त्यात, मागील निवडणुकांमध्ये ज्या प्रभागात आरक्षण होते, त्या प्रभागात या वेळी आरक्षण नाही. आरक्षणाच्या प्रभागाच्या लोकसंख्येत नियमबाह्य बदल झाले आहेत. अशा स्वरुपाच्या हरकती असून आरक्षण सोडत नियमबाह्य झाल्याची एक
हरकत आहे.