सातारा : सातारा जिल्ह्यातील 25 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आले आहेत, अशी माहिती सोमवारी रात्री उशिरा मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1361 झाली आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 25 नागरिकांचे अहवाल पॉसिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बाधित अहवाल आलेल्यांची आकडेवारी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे :
सातारा तालुक्यातील जिहे येथे 1, दौलतनगर येथे 1, अपशिंगे येथे 1, सातारा शहरात कारागृह येथे 3, रविवार पेठेत 3, बुधवार पेठेत 1, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील 3 कर्मचारी.,
कोरेगाव तालुक्यातील खडखडवाडी येथे 1, चंचली येथे 1, कोरेगाव शहरात 2, आसनगाव येथे 1 ल्हासूर्णे येथे 1,
वाई तालुक्यातील आसले येथे 1,
कराड तालुक्यतील तारुख येथे 3, शामगाव येथे 1, येळगाव येथे 1 अशा एकूण 25 नागरिकांचा समावेश आहे.