तालिबानच्या हल्ल्यात 25 ठार

काबुल – अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात तालिबान्यांनी सरकार समर्थक दलांवर केलेल्या हल्ल्यात 25 जण ठार झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. शुक्रवारी नाहरीन भागात ही धुमश्‍चक्री झाली. त्या भागात कार्यरत असलेल्या सुरक्षा जवानांवर तालिबान्यांनी संघटीतपणे हल्ला चढवला. त्यात अन्य आठ सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा जवान आणि तालिबानी बंडखोर यांच्यातील ही चकमक अनेक तास सुरू होती.

तालिबान्यांनी आता सुरक्षा जवानांवरील हल्ले हा आपला मुख्य कार्यक्रम ठरवला आहे. एकीकडे अमेरिकेशी तालिबानची चर्चेची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांनी हा प्रकार केल्याने या चर्चेला काही अर्थ उरला आहे काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आज कतार मध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी आणि तालिबानी प्रतिनिधींमध्ये अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याविषयी चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.