बांदा : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील पलानी तहसीलच्या खप्तीहकलां गावात 25 गायी मृतावस्थेत सापडल्या आहेत. रविवारी उपजिल्हाधिकारी यांनी याची माहिती दिली.
पैलानी तहसीलचे उपजिल्हाधिकारी मन्सूर अहमद यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी रविवारी खप्तीकलां गावात गोशाळा चालवणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थाची पाहणी केली. त्या गौशाळेत 25 गायी चाऱ्याअभावी मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत
ते म्हणाले, सर्व मृत गायींचे मृतदेह पडलेले होते. कुत्रे गाईचे मांस खात होते. बऱ्याच गायी आजारी आहेत, ज्यावर उपचारही केले जात नाहीत. गायींना खाण्यासाठी फक्त कोरडा चारा देण्यात आला होता.
थंडी पासून वाचण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. एका खाजगी संस्थेला गोशाळा चालवण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. गोशाळेत 649 गाईची नोंदणी आहे.