18 औषध कंपन्यांच्या 25 बॅच सदोष

स्वस्त औषधांच्या केंद्रीय योजनेला सदोष औषधांची विक्री

नवी दिल्ली- देशभरातील 18 वेगवेगळ्या औषध कंपन्यांच्या 25 बॅचमधील घटक सदोष असल्याचे तपासणीमध्ये आढळून आले आहे. केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना’अर्थात “बीपीपीआय’ची अंमलबजावणी करणाऱ्या “ब्युुरो ऑफ फार्मा पीएसयु ऑफ इंडिया’ने या औषधांची तपासणी केल्यानंतर जानेवारी 2018 पासूनच्या बॅचमध्ये सदोष औषधे असल्याचे आढळून आले आहे. या 18 पैकी 17 औषध कंपन्या खासगी आहेत, तर “इंडियन ड्रग ऍन्ड फार्मासोटिकल्स लिमिटेड’ म्हणजेच “आयडीपीएल’ही एक कंपनी सरकारी आहे. “बीपीपीआय’ आणि “आयडीपीएल’ या दोन्ही सरकारी संस्था आहेत. औषध कंपन्यांकडून “बीपीपीआय’साठी जेनेटिक औषधांची खरेदी केल्यानंतर ही औषधे विविध जनौषधी केंद्रांना वितरीत केली जातात. 31 डिसेंबर 2018 च्या आकडेवारीनुसार देशभरात 4,677 जनौषधी केंद्रे कार्यरत आहेत.

“एएमआर फार्मा इंडिया प्रा.लि.’च्या मधुमेह आणि रक्‍तदाबावरील औषधांच्या जानेवारी 2018 पासूनच्या 2 बॅच सदोष आढळल्या आहेत. त्याच प्रमाणे मॉडर्न लॅबोरेटरीज, लेगेन हेल्थकेअर, रवियान लाईफ सायन्स, मॅक्‍स केम फार्मासोटिकल्स, थेओन फार्मासोटिकल्स, मॅस्कट हेल्थ सिरीज आणि टेर्रेस फार्मासोटिकल्सच्या प्रत्येकी दोन बॅच सदोष आढळल्या आहेत. इंडियन ड्रग ऍन्ड फार्मासोटिकल्स लिमिटेडच्या पित्त आणि पचनाशी संबंधित व्याधींवरील औषधांची बॅच सदोष असल्याचे आढळले आहे. याशिवाय बयोजेनेटिक ड्रग, विंग्ज बयोटेक, झेनिथ ड्रग आणि क्‍वालिटी फार्मासोटिकल्स या कंपन्याही सदोष औषध विक्री करत असल्याचे आढळून आले आहे.

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन सिंह यांनी या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच केले आहे. “बीपीपीआय’ला सदोष औषधांची विक्री केल्याबद्दल 7 कंपन्यांना दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×