भारत-अमेरिका कार्यकारी सुकाणू गटाची 24 वी बैठक संपन्न

नवी दिल्ली – भारत-अमेरिका कार्यकारी सुकाणू गटाची 24 वी बैठक 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीला अमेरिकी लष्कराचे 12 सदस्यीय शिष्टमंडळ उपस्थित होते तर वेगवेगळ्या ठिकाणांहून 40 अधिकारी दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

अमेरिकी लष्कराच्या पॅसिफिक क्षेत्राचे डेप्युटी कमांडिंग जनरल मेजर जनरल डॅनियल मॅकडेनियल यांनी अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. भारतीय लष्कराच्या शिष्टमंडळात 37 अधिकारी होते.

दरवर्षी या मंचावर भारत आणि अमेरिका लष्करी सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. विविध क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने परस्पर हिताच्या अनेक समकालीन मुद्‌द्‌यांवर या बैठकीत चर्चा झाली.

कोविड-19 च्या निर्बंधामुळे प्रथमच ही बैठक प्रत्यक्ष आणि व्हर्चुअल स्वरूपात झाली. संरक्षण सहकार्याशी संबंधित मुद्दे आणि सामायिक हिताच्या मुद्‌द्‌यांवरही या बैठकीत चर्चा झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.