सातारा – जिल्ह्यातील 248 नागरिक करोनाबाधित

सातारा -जिल्ह्यात मंगळवारी (दि. 24) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 248 नागरिक करोना संक्रमित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. गेल्या आठवडाभरापासून पॉझिटिव्ह अहवालांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कालच्या आकडेवारीनुसार करोनाबळींचे प्रमाणही वाढले आहे. ही धोक्‍याची घंटा आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही आपले आरोग्य

जपण्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 50 हजार 351 झाली आहे. सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात मंगळवार पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ, सदरबझार, शाहूनगर प्रत्येकी दोन, शनिवार पेठ, केसरकर पेठ, पंताचा गोट प्रत्येकी एक, इतरत्र नऊ, करंजे पेठ तीन, संगमनगर, पाडळी, विलासपूर, अतीत, गोवे, क्षेत्र माहुली प्रत्येकी दोन, संभाजीनगर, शाहूपुरी, सैदापूर, दौलतनगर, वनवासवाडी, लिंबाचीवाडी, करंडी, शेरेवाडी, अंगापूर, कुंभारगाव, गडकर आळी, लिंब, नागठाणे, चिंचणेर वंदन, शिवथर प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यामध्ये कराड शहर पाच, विद्यानगर दोन, उंब्रज, कोर्टी, शेरे, सुर्ली, वडोली निळेश्‍वर, मलकापूर, रेठरे बुद्रुक, नांदगाव, सोनकिरे प्रत्येकी एक, पाटण तालुक्‍यात मरळी दोन, मोरगिरी, मंद्रुळकोळे प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यामध्ये पिंपळवाडी आठ, फलटण शहर पाच, कोळकी चार, काशीदवाडी तीन, तरडगाव, साखरवाडी प्रत्येकी दोन, जिंती, सस्ते फाटा, रावडी बुद्रुक, पिंपळगाव, वाखरी, निंभोरे, सावडी, सांगवी, कापडगाव, मिरडेवाडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात मायणी चार, वडूज दोन, कातळगेवाडी, पुसेगाव, होळीचागाव, दातेवाडी, खटाव प्रत्येकी एक, माण तालुक्‍यात गोंदवले खुर्द सात, दहिवडी, म्हसवड, विरळी, धामणी प्रत्येकी पाच, गोंदवले बुद्रुक चार, इंजबाव दोन, पळशी, शिंगणापूर, देवापूर, देवापूर, बोडके प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात कोरेगाव सात, भाडळे पाच, रहिमतपूर, बिचुकले, शिरढोण प्रत्येकी तीन, खेड दोन, कुमठे, आसगाव, शिरंबे, आर्वी, एकसळ, गोगावलेवाडी, घाडगेवाडी, चांदवली, दुधी, साप प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यात डांगरेघर एक, वाई तालुक्‍यामध्ये वाई शहरात इतरत्र एक, रामडोह आळी चार, सदाशिवनगर तीन, गंगापुरी, यशवंतनगर प्रत्येकी दोन, खंडाळा तालुक्‍यातील खंडाळा आठ, शिरवळ सात, भादे, लोणंद, बावडा प्रत्येकी पाच, मिरजे एक, महाबळेश्‍वर तालुक्‍यात पाचगणी दोन, महाबळेश्‍वर, भिलार प्रत्येकी एक, इतर सहा, बाहेरील जिल्ह्यांमधील सोलापूर दोन, पुणे, ठाणे, सांगली प्रत्येकी एक, असे 248 नागरिक करोनाबाधित झाले आहेत.

आणखी बारा बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 12 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. काल जाहीर केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या तिपटीने अधिक असल्याने जिल्हा प्रशासनसमोर नव्याने आव्हान उभे राहिले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा असताना, गेले काही दिवस बाधितांची संख्या वाढत आहे. त्यात काल करोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने हा चिंतेचा विषय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1699 करोनाबळी झाले आहेत. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आरफळ, ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, नागठाणे, ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, तारळे, ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना, शुक्रवार पेठ, ता. सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शिरंबे, ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, म्हसवे (वर्ये), ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर, ता. खंडाळा येथील 85 वर्षीय पुरुष, कोळकी, ता. फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, संत भानुदासनगर, फलटण येथील 81 वर्षीय पुरुष, सांगवी, ता. जावळी येथील 68 वर्षीय पुरुष, म्हसवड, ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, अशा 12 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या सतराशेच्या जवळ पोहोचली आहे.

109 नागरिक करोनामुक्‍त
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 109 नागरिकांना बुधवारी घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील आणखी 340 नागरिकांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.