पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 2427 बाधित

उपचारादरम्यान 54 जणांचा मृत्यू

पिंपरी – गेल्या 24 तासांत पिंपरी-चिंचवड शहरात आणखी 2427 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1 लाख 86 हजार 25 इतका झाला आहे. तर 54 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील 2279 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 148 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील 32 जण शहरातील रहिवाशी होते.

तर शहराबाहेरील 22 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 2412 वर पोहोचला असून शहराबाहेरील 1046 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 3458 ची संख्या आज गाठली.

आतापर्यंत शहरातील 1 लाख 60 हजार 664 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 10 हजार 260 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 1980 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.