- 94 जणांचा डिस्चार्ज
- 9 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधितांच्या संख्येने आज पुन्हा दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. आज शहरात 241 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 94 जण करोनामुक्त झाले आहेत.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी (दि. 23) शहरात 241 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 55 हजार 974 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 9 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 3 व शहराबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. तर गेल्या 24 तासात 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4265 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 94 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 50 हजार 571 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4581 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 832 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 306 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1138 इतकी आहे.