नवी दिल्ली – करोनाचे संकट असतानाच आणखी एका विषाणूने तोंड वर काढल्याचे बघायला मिळाले आहे. झिका विषाणूचे रुग्ण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूचा पहिला रुग्ण केरळ मध्ये मिळाला आहे. यामुळे आणखी चिंतेत भर पडली आहे.
केरळमध्ये एक २४ वर्षीय गर्भवती महिला झिका विषाणूने बाधित झाली असल्याची माहिती केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. याचबरोबर तिरुअनंतपुरममधून झिका विषाणूचे आणखी १३ संशयित रुग्ण असल्याचे समोर येत आहे. या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ला पाठविण्यात आले आहे. या चाचणीचे निधान आल्यानंतर संक्रमणाची पुष्टी केली जाऊ शकल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
या महिलेने गेल्या ७ जुलै रोजी आपल्या मुलाला जन्म दिला. या बाळामध्येही झिका विषाणू संक्रमण आढळून आले आहे. महिलेला २८ जून रोजी ताप, डोकेदुखी तसेच शरीरावर लाल डाग आढळल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चाचणीत महिला झिका विषाणू संक्रमित असल्याचे समोर आल्यानंतर चाचणीचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले. महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.
झिका व्हायरसचे लक्षण
झिका व्हायरसला बळी पडलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. पाचपैकी एका रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू होतो. किरकोळ ताप, डोळे लाल होणारे, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी अशा प्रकारच्या तक्रारी व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाच्या येतात. प्रत्यक्षात खूपच कमी प्रमाणात होणार्या नर्व्हस सिस्टिमचा हा एक आजार मानला जातो. तज्ञ या प्रकाराला गुलीयन बार सिंड्रोम असेही म्हणतात. या कारणामुळे लकवासुद्धा येऊ शकतो. आजघडीला झिका व्हायरसवर कोणताच उपचार निश्चित नाही. तसेच ठोस औषध देखील शोधले गेलेले नाही. त्यामुळे झिका व्हायरच्या रुग्णांना भरपूर पाणी पिण्याचे आणि आराम करण्याचा सल्ला दिला जातो. झिकाच्या रुग्णांपुढे सर्वात मोठे आव्हान म्हणजे गर्भात वाढणार्या बाळाचे आरोग्य. हा व्हायरस गर्भात वाढणार्या मुलांंत मायक्रोसेङ्गाली नावाचा आजार बळावू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, झिका व्हायरसमुळे होणार्या मायक्रोसेङ्गाली आणि गिलीयन बार सिंड्रोमसारखे आजार होतात. या व्हायरसला बळी पडलेल्या काही मुलांच्या मेंदूत हा व्हायरस आढळून आला आहे. अनेक मुलांच्या नाळेतही हा व्हायरस आढळून आला आहे.