नवी दिल्ली – मध्यंतरी चांगला वेग पकडल्यानंतर करोना विरोधी लसीकरण मोहीम पुन्हा एकदा थंडावल्याचे गेल्या दोन दिवसांतले चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यांकडे अजुनही 73 लाख डोस शिल्लक असून पुढील तीन दिवसांत त्यांना आणखी 24 लाख 65 हजार डोसचा पुरवठा केला जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 32 कोटी 13 लाख 75 हजार डोस पुरवण्यात आले असल्याचेही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यास आणि जास्तीत जास्त डोस उपलब्ध करून देण्यास केंद्र सरकार कटीबध्द असल्याचे सांगतानाच राज्यांना मोफत लस उपलब्ध करून दिली जात असल्याचा पुनरुच्चारही करण्यात आला आहे.