मोरगाव – बारामती तालुक्यात असणारे अष्टविनायक आराध्य दैवत मोरगाव येथील गावठाण हद्दीत आजपासून बाराही महिने चोवीस तास थ्री-फेज वीजपुरवठा सुरू होणार आहे. यामुळे येथील व्यावसायिक व उद्योजकांची चिंता मिटली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांकडे येथील सरपंच निलेश केदारी यांनी पत्रव्यवहार करून मागणी केली होती.
मोरगावचे अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र असल्याने येथे अनेक राजकीय व्यक्तीं, सिनेतारका, देश देशभरातून अनेक व्हीआयपी व्यक्तींसह, मोठ्या संख्येने भक्तगण येत असतात. येथे छोट्या- मोठ्या उद्योगधंद्यांची तीनशेपेक्षा अधिक दुकाने आहेत.
यामुळे सरपंच निलेश केदारी यांनी सुमारे सहा महिन्यापूर्वी अजित पवार यांकडे मयुरेश्वर मंदिर व गावठाण हद्दीमध्ये चोवीस तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू होण्याबाबतचे पत्र उपमुख्यमंत्री अजीत पवार यांकडे दिले होते .
त्यानुसार आज मोरगाव येथे अतीरीक्त दोन विज रोहीत्राची उभारणी केली आहे . त्यावर परिसरातील शेती पंपाचा अधिभार जोडून गावठाणामध्ये थ्री फेज वीजपुरवठ्याची जोडणी वेगळी केली असल्याची माहीती विज वितरण कंपनीचे शाखा अभीयंता दिलीप नाळे यांनी दिली .
आजपासून बाराही महीने चोवीस तास थ्री- फेज विज सुरु राहणार असल्याने येथील हॉटेल व्यवसायिक, लॉजिंग-बोर्डिंग , मयुरेश्वर मंदिर , विट कारखाने , गारमेंट , ट्रक बॉडी बांधणी व्यवसाईक अशा 300 पेक्षा अधिक व्यवसायिकांना याचा लाभ होणार आहे