शहरात 2387 टपाली मतदान

पिंपरी – विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघात 499, चिंचवडमध्ये 1083 आणि भोसरी मतदारसंघात 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि. 24) सकाळी आठ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. पोस्टामार्फत आलेल्या मतपत्रिकाच त्यामध्ये गृहित धरण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या टपाली मतांचा मात्र विचार केला जाणार नसल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक कामात व्यस्त असलेले आणि बाहेरगावी असलेल्या मतदारांना टपाली मतदान करता येते. त्यामध्ये निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच बंदोबस्तासाठी असलेले भारतीय लष्करी जवान आणि पोलीस यांचा सर्वाधिक समावेश आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 53 हजार 545 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार 1 लाख 85 हजार 939 तर, महिला मतदार 1 लाख 67 हजार 600 इतके आहेत. तृतीयपंथी अन्य मतदार 6 आहेत. 449 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन येथे स्वीकारली जात आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाच लाख 18 हजार 309 एकूण मतदार आहेत. त्यामध्ये दोन लाख 45 हजार 486 पुरुष तर दोन लाख 41 हजार 318 महिला आणि 32 इतर मतदार आहेत. 1083 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. भोसरीत चार लाख 41 हजार 125 एकूण मतदार आहेत. दोन लाख 41 हजार 601 पुरुष आणि एक लाख 99 हजार 493 स्त्री मतदार आहेत. तर, दिव्यांग 31 आणि इतर तीन मतदार आहेत. 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि. 24) सकाळी आठ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)