पुणे – दिवसभरात करोनाच्या 233 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात 343 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
सध्या 2725 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील 222 जण क्रिटीकल आहेत. गेल्या चोवीस तासांत पाच रुग्णांचा मृत्यु झाला असून त्यातील तीनजण पुण्याबाहेरील आहेत. दिवसभरात 3398 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.