पुणे : पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ हजार ४५७ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण १ हजार १३९ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकुण ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात १ हजार ४५७ बाधित रुग्ण असून ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात १ हजार ३१९ बाधित रुग्ण असून ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात ३३ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ६५ बाधित रुग्ण असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २९ बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात ११ बाधित रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण १५ हजार ८११ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १४ हजार ९३५ चा अहवाल प्राप्त झाला आहे. ८७७ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १३ हजार ४२८ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ४५७ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील ५४ लाख ३५ हजार ५४६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत २ कोटी ६ लाख ३ हजार ९४ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी १ हजार १३१ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.