नवी दिल्ली – योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर 23 मे हा दिवस भाजपची ऐतिहासिक वाटचाल आहे. म्हणून या दिवसाला ‘मोदी दिवस’ किंवा ‘जनकल्याण दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा. असे म्हणून योगगुरू बाबा रामदेव यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हरिद्वार येथे एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलतांना योगगुरू बाबा रामदेव लोकसभा निवडणुकीबाबत म्हटले की,’२३ मे हा दिवस भाजपची ऐतिहासिक वाटचाल आहे. म्हणून या दिवसाला ‘मोदी दिवस’ किंवा ‘जनकल्याण दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा.’
काही दिवसांपूर्वी, ‘बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद मोदींच व्यक्तिमत्व हे हिमालयासारखे आहे. इतर लोकांशी त्यांची तुलनाही होऊ शकत नाही. देशाला राजकीय स्थैर्य, विकास आणि बळकट करण्यात मोदींचा सिंहाचा वाटा आहे. बाबा रामदेव असेही म्हटले होते.