झिम्बाब्वेमध्ये खाणीतील पूराच्या पाण्यात 23 जणांचा मृत्यू 

हरारे – सोन्याच्या खाणीमध्ये पूराचे पाणी घुसल्याने किमान 23 बेकायदेशीर खाण कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्‍त होत आहे. राजधानी हरारेपासून अग्नेयेच्या दिशेने 145 किलोमीटरवर काडोमा येथील वापरात नसलेल्या खाणीमध्ये ही दुर्घटना घडली. बचाव पथकाकडून खाणीतील पूराचे पाणी पंपांद्वारे उपसले जात आहे.

पूरामुळे धरणाची भिंत मंगळवारी फुटली. त्यामुळे पूराचे पाणी या खाणीमध्ये घुसले असे खाण कंपनीचे प्रवक्‍ते विल्सन ग्वाटिरिंगा यांनी सांगितले. या खाण कंपनीच्या काही खाणी या परिसरामध्ये आहेत. त्यापैकी काही काळापासून बंद असलेल्या खाणीत ही दुर्घटना घडली आहे. मात्र मानवतेच्या दृष्टीकोनातून कंपनी बचाव कार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले. खाणीमध्ये अडकलेल्या 23 कामगारांची जिवंत वाचण्याची शक्‍यता फारच धूसर असल्याचे जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.