अमेरिकेत हिमवादळाच्या तडाख्यात 23 जणांचा मृत्यू

मिसिसिप्पीच्या काही भागात बर्फ, जोरदार गारांचा पाऊस

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या काही भागाला सध्या गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत असून या कडाक्‍याच्या थंडीमुळे किमान 23 जण दगावले आहेत. यापैकी बहुतांश व्यक्तींचा मृत्यू हिमवादळात किंवा त्याच्या परिणामांमुळे झाला आहे. काल हे हिमवादळ पूर्व कॅनडाच्या दिशेने सरकले असले तरी त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

टेक्‍सासमधील कोट्यावधी लोक वीजप्रवाह खंडीत झाल्यामुळे शिवाय थंडीने कापत राहिले. अमेरिकेला तेल आणि गॅस पुरवठा करणाऱ्या देशाच्या दक्षिणपूर्व भागातील टेक्‍सासमध्ये जोरदार हिमवादळ अजूनही सुरू आहे. अमेरिकेच्या “नॅशनल वेदर सर्व्हिस’ ने पूर्व टेक्‍सासपासून मेरीलॅंडच्या ईस्ट कोस्ट राज्यापर्यंतच्या भागात कडाक्‍याच्या थंडीचा इशारा दिला आहे.

या वादळामुळे टेक्‍सास, लुझियाना, आर्कान्सा आणि मिसिसिप्पीच्या काही भागात बर्फ, गारांचा पाऊस आणि जोरदार बर्फ पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.