करोना रूग्णांच्या सुरक्षेसाठी 220 होमगार्ड

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन सेंटर आणि कोविड केअर सेंटरमधील रूग्णांच्या सुरक्षेसाठी 220 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या 5 महिन्यांच्या मानधनासाठी 3 कोटी 11 लाख 75 हजार 595 खर्च करण्यात आला आहे.

शहरात 15 पेक्षा अधिक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. त्यातील रुग्णांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाकडून पालिकेने 220 होमगार्ड घेतले आहेत. त्यांना प्रतिदिन 988 रुपये मानधन (कर्तव्यभत्ता) दिले जाते.

त्याप्रमाणे 23 मार्च ते 28 ऑगस्ट असा 5 महिन्यांसाठी 3 कोटी 11 लाख 75 हजार मानधन अदा करण्यात आले आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने या पुढेही हे काही महिने कोविड केअर सेंटरसाठी होमगार्ड नेमले जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.