पुणे ( GBS Virus Pune ) – पुण्यात रहस्यमयी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. गुईलियन-बारे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) नावाच्या या दुर्मिळ आजाराचे २२ संशयित रुग्ण सध्या प्रशासनाच्या निरीक्षणाखाली आहेत. यामुळे महापालिकेसह आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
आजाराची लक्षणे आणि माहिती
गुईलियन-बारे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार असून, यामध्ये रुग्णाच्या प्रतिकारशक्तीमुळे स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला होतो. याचा परिणाम मज्जातंतूंवर होतो, ज्यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा, हात-पाय बधिर होणे, हालचालींवर नियंत्रण न राहणे, आणि काही गंभीर परिस्थितीत श्वसनास अडचण निर्माण होण्याची शक्यता असते.
प्रमुख लक्षणे: | ( GBS Virus Pune )
हात-पायात बधिरपणा किंवा झिणझिण्या
स्नायूंमध्ये अचानक कमकुवतपणा
हालचालींवर नियंत्रण नसणे
श्वास घेण्यास त्रास
वेदना किंवा झिणझिण्या यांमुळे हालचाल करण्यास अडचण
पुण्यातील परिस्थिती ( GBS Virus Pune )
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित २२ रुग्णांपैकी ६ रुग्ण पुणे शहरातील तर उर्वरित जिल्ह्यातील आहेत. हे रुग्ण उपचारासाठी पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. सध्या या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडे पाठवण्यात आले आहेत.
संसर्गजन्य नाही, मात्र सतर्कता आवश्यक ( GBS Virus Pune )
हा आजार संसर्गजन्य नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या रुग्णालयांमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते, त्या परिसरातील व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे.
महापालिकेने घेतली पुढाकार
रुग्णांची संख्या लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने गुईलियन-बारे सिंड्रोमसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. संभाव्य रुग्णांना त्वरित वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.
लोकांना सूचना ( GBS Virus Pune )
आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. थकवा, बधिरपणा किंवा स्नायूंमध्ये अचानक कमकुवतपणा जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे.
गुईलियन-बारे सिंड्रोम हा दुर्मिळ आणि गंभीर आजार असला तरी, त्वरित निदान व उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही शंका वाटल्यास रुग्णांनी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.