पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध आहे. आता इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. येत्या तीन-चार दिवसांत आरक्षण सोडतीचा राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रभाग क्रमांक -29, 19, 22, 20, 43, 11, 24, 18, 46, 37, 44, 16, 34, 39, 35, 25, 6, 17, 33,14, 3 आणि 32 या प्रभागांतील 22 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव तर प्रभाग क्रमांक 41, 6 आणि 44 हे या तीन प्रभागांतील तीन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत.
महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा 1 फेब्रुवारीला तर अंतिम आराखडा हा (दि. 12) मे रोजी प्रसिद्ध केला आहे. तीन सदस्यांचे 45 प्रभाग आहेत, तर चार सदस्यांचा सांगवी प्रभाग क्रमांक 46 हा आहे. असे एकूण 46 प्रभाग आहेत. एकूण 139 नगरसेवक संख्या आहे. त्यातील एकूण 69 जागेवर महिलांचे आरक्षण असणार आहे. अनुसूचित जातीच्या 22 व अनुसूचित जमातीचे 3 जागा आहेत, तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी 114 जागा आहेत.
अनुसूचित जमाती (एसटी)
प्रभाग – 41, जवळकरनगर, पिंपळे गुरव गावठाण (2 हजार 333), प्रभाग 6 दिघी-बोपखेल गावठाण (2 हजार 573), प्रभाग 44, पिंपळे गुरव, राजीव गांधीनगर (2 हजार 18).
हे आहेत अनुसूचित जाती (एसी) 22 प्रभाग
प्रभाग क्रमांक – 29 भाटनगर, मिलिंदनगर – (16 हजार 508 लोकसंख्या), प्रभाग 19 – चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर (11 हजार 571), प्रभाग – 22 -ओटास्कीम, निगडी गावठण (11 हजार 495), प्रभाग 20 – काळभोरनगर, रामनगर, विज्ञानगर (11 हजार 482), प्रभाग 43 – दापोडी, गणेशनगर (11 हजार 134), प्रभाग 11 – इंद्रायणीनगर, बालाजीनगर (8 हजार 950), प्रभाग 24 – मामुर्डी, किवळे-रावेत (8 हजार 23), प्रभाग 18 – मोरवाडी, मासूळकर कॉलनी, गांधीनगर (7 हजार 999), प्रभाग 46 – जुनी सांगवी, ममतानगर (7 हजार 919), प्रभाग 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडक (7 हजार 209), प्रभाग 44 -पिंपळे गुरव, राजीव गांधीनगर (7 हजार 11), प्रभाग 16 – नेहरूनगर, विठ्ठलनगर (6 हजार 950), प्रभाग 34 – बापूजीबुवानगर, अशोका सोसायटी (6 हजार 871), प्रभाग 39 – पिंपळे निलख, वेणूनगर, कावेरीनगर (6 हजार 742), प्रभाग 35 – थेरगाव, बेलठीकानगर (6 हजार 666), प्रभाग 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा (6 हजार 375), प्रभाग 6 – दिघी-बोपखेल गावठाण (6 हजार 80), प्रभाग 17 – वल्लभनगर, एच ए कॉलनी, संत तुकारामनगर (6 हजार 342), प्रभाग 33 – रहाटणी (5 हजार 908), प्रभाग 14 – यमुनानगर, कृष्णानगर, त्रिवेणीनगर (5 हजार 813), प्रभाग 3 – बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी (5 हजार 763), प्रभाग 32 – तापकीरनगर, ज्योतिबानगर (5 हजार 701).