विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली कारवाई
नगर –निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 186 गुन्हे दाखल करून 141 आरोपींना अटक केली. आचारसंहितेत दारू विक्री करण्यास बंदी असूनही याठिकाणी अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 22 हॉटेलचे परवाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रद्द करण्यात आले आहे.
या कारवाई 24 वाहने जप्त केली असून, असे एकूण 36 लाख 41 हजार 597 रुपयांचा मुद्देमाल व 5 हजार 650. 27 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अवैद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्हाधिकारी द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात अनियमितता आढळून आल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली.
यांचे झाले परवाने रद्द…
मे.सी.के वाईन्स (श्रीरामपूर), आर.व्ही गायकवाड (कोपरगाव), बी.एम. मोटे,(नेवासा), राहुल उगले (देहरे, ता. नगर), एस.ए.पटेल (नेवासा), बी.एम. कलाल), एच.एस. खेमनर (संगमनेर), सातभाई फडणवीस (कोपरगाव), आर.के. गटागट,(पाथर्डी), हॉटेल अपना (कोपरगाव), हॉटेल बाबज, हॉटेल विजय (नगर), हॉटेल कमलेश (संगमनेर), हॉटेल द्वारका (कोपरगाव), हॉटेल न्यू विजयसुख,(राहुरी), हॉटेल अतिथी (अकोले), हॉटेल संजोग (नगर), हॉटेल सुरज (नगर), हॉटेल मान (श्रीरामपूर), हॉटेल पिंगारा (नगर), हॉटेल मातोश्री (नगर) व हॉटेल इंद्रायणी (नगर) या हॉटेल चे परवाने रद्द करण्यात आले आहे.